CoronaNewsUpdate : गेल्या 24 तासात आढळले 23,446 नवे रुग्ण , 448 रुग्णांचा मृत्यू , 14, 253 रुग्णांना डिस्चार्ज

23,446 new #COVID19 cases and 448 deaths reported in Maharashtra today; 14,253 patients discharged. The total cases in the state rise to 9,90,795, including 28,282 deaths and 7,00,715 patients discharged. Active cases 2,61,432: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/ksd7KDE50x
— ANI (@ANI) September 10, 2020
गेल्या २४ तासात २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची बाधा होऊन २८ हजार २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या ९ लाख ९० हजार ७९५ इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ६१ हजार ४३२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील २४ तासांमध्ये १४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण ७ लाख ७१५ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या आता ४४ लाखांच्या वर गेली आहे. एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक ९५ हजार ७३५ नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी ६ सप्टेंबर रोजी ९३ हजार ७२३ कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात ११७२ जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या ७५ हजार ६२ झाली असली तरी दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३४ लाख ७१ हजार ७८४ रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट ७७.७४% आहे. असे असले तरी देशात अजूनही ९ लाख १९ हजार १८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.