CourtNewsUpdate : जाणून घ्या राज्यातील न्यायालयांच्या कामकाजाच्या वेळा , आज पासून सुरु होताहेत कोर्ट

औरंगाबाद- उद्या पासून महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व जिल्हान्यायालये आणि खंडपीठाच्या कामकाजाच्या वेळा उद्यापासून खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती, जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश यांच्या सोयीनुसार ठेवण्याचे आदेश उच्चन्यायालयाचे मुख्य प्रबंधक दिनेश सुराणा यांनी जारी केले आहेत.
गोवा जरी स्वतंत्र राज्य असले तरी त्या राज्यातील न्यायालयीन कामकाज हे मुंबई उच्चन्यायालयाच्या अधिकारात येते. तसेच राज्यात जिल्हा आणि तालुके मिळून ३९ कोर्ट आहेत. मुख्य प्रबंधक दिनेश सुराणा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की,कोर्टातील प्रथमश्रेणी आणि द्बितीयश्रेणी अधिकार्यांची शंभर टक्के उपस्थिती ११ सप्टेंबर पासून असायला हवी तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांची ३० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तसेच राज्यातील उच्चन्यायालयाचे, खंडपीठाचे व प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिशांनी कामकाजाच्या वेळा आपल्या सोयीनुसार ठरवाव्या त्यानुसार प्रमुख जिल्हासत्र न्यायाधिश एस.डी. टेकाळे यांनी जिल्हा न्यायालयातील न्यायधिशांच्या वेळा ११ ते २ आणि अधिकारी कर्मचार्यांच्या वेळा १०.३० ते २.३० ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.