चर्चेतली बातमी : मुंबई आणि मुंबई पोलिसांचा अवमान करणाऱ्या कंगनावर टीकेची झोड आणि कारवाईचे संकेत, खा. राऊत यांनी दिले “हे” प्रत्युत्तर

मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.
promise.
जय हिंद
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) September 4, 2020
‘मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.’ अशी थेट धमकी देणाऱ्या कंगनावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे भाजपनेते आशिष शेलार यांनीही तिच्यावर टीका केली आहे तर तिला सपोर्ट करणारे भाजपच्या राम कदमांचे वक्तव्य पक्षाचे नव्हे तर त्यांचे व्यक्तिगत वक्तव्य असल्याचा खुलासा केला आहे . मुंबई आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात ट्विट करणाऱ्या कंगनाला सपोर्ट करणारे ट्विट राम यांनी केले होते
दरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादळ निर्माण झालं आहे. संजय राऊतांवर टीका करत ” मुंबई हे काय POK आहे का ? ” असा प्रश्न तिने केला होता. त्यावर महाराष्ट्रातून तिच्यावर जोरदार टीका झाली होती. खासदार संजय राऊत यांनीही पुन्हा एकदा कंगनाला नाव न घेता फटकारलं आहे. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंगनाला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे कि , ” मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे…ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. Promise. ” या आधीही कंगनाने ट्वीट करत टीका केली होती.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे. कंगनानं पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की ” 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा .
कंगनाच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात गदारोळ आणि गृहमंत्र्यांची भूमिका
सुशांत सिंह रजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने केलेल्या विधानांमुळे आणि त्यानंतर मुंबईची पाक व्याप्त काश्मीरसोबत केलेली तुलना यामुळे सोशल मीडियावर आणि विविध स्तरामध्ये कंगनावर अनेकांनी नाराजीचा सूर दाखवला. मुंबईविरुद्ध वक्तव्य केल्यानंत संतप्त ट्वीट करत मराठी कलाकारांनी खडेबोल सुनावले आहेत. मुंबई आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कंगनाने मुंबई पोलिसांची बदनामी केलीय. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. कंगनामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत आहे. आमचे पोलीस अधिकारी तिच्या विधानाची पाहणी करतील आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतील, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी कंगनाला झापले आहे. बालीवूड मधील स्टार्स , मनसे , शिवसेना , भाजप यांच्या नेत्यांनीही कंगनावर टीका केली आहे.