UttarPradeshNewsUpdate : रुग्णालयाचे बिल देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून “त्यांचे” बाळ विकले एक लाखाला….

एका खासगी रुग्णालयात प्रसुतीनंतर गरीब दाम्पत्याला ३५००० रुपये जमा करता न आल्याने नवजात मुलाचा लिलाव करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या आग्रा झिल्यात हि लाजिरवाणी आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली . बाळाचे आई -वडील दोघानांही लिहिता वाचता येत नसल्याने , डॉक्टरांनी जबरदस्तीने कागदावर अंगठा लावून मुलाच्या बापाकडून बाळ हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. सदर महिला रुग्णालयाकडे बाळ देण्यासाठी हात जोडून विनवणी करीत होती. मात्र पतीही यात काहीच करू शकला नाही. पीडित कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, रुग्णालयाला फी न दिल्याने डॉक्टरांनी सांगितले की पैसे दिले नाही तर बाळ द्यावं लागेल. या प्रकरणी जिल्हाधिकारी प्रभू एन सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले असून आरोग्य विभागाने आणखी काही अनियमितता आढळल्याने या रुग्णालयाला सील केले आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , शंभू नगर निवासी शिव नारायण, वय ४५, रिक्षा चालक आहेत. त्यांनी सांगितले की चार महिन्यांपूर्वी त्यांंचं घर कर्जात गेलं होतं. २४ ऑगस्टला त्याची पत्नी बबिताला वय ३६, प्रसव कळा सुरू झाल्या. त्यानंतर त्यांनी ट्रान्स भागातील जेपी रुग्णालयात दाखल केलं, बबिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. २५ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज करण्याची वेळ आली तेव्हा रुग्णालयाने ३५००० रुपयांचं बिल दिलं. रिक्षा चालक इतकी मोठी रक्कम देऊ शकत नव्हता. त्याच्याजवळ केवळ ५०० रुपये होते. दरम्यान रुग्णालयाचं बिल न दिल्यामुळे डॉक्टर म्हणाले, की बिलाची रक्कम तर द्यावी लागेल. यानंतर दाम्पत्याला जबरदस्तीने कागदावर अंगठा द्यायला सांगितले आणि नवजात बाळाला ताब्यात घेत या दाम्पत्याला ६५००० रुपये देऊन घरी पाठवलं. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.