MaharashtraNewsUpdate : एका नजरेत जाणून घ्या , महाराष्ट्रात काय चालू काय बंद ?

Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (1/3)#MissionBeginAgain pic.twitter.com/2tgFa8poco
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 31, 2020
कोरोना लॉकडाऊन आणि अनलॉकबाबतचे आपले नियम काल केंद्राने जाहीर केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नियम जारी केले आहेत. या नव्या नियमानुसार राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी मोठ्या प्रमाणात उठविण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने “मिशन बिगेन अगेन” अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र जिम, मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान नवे नियम जारी करताना राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
राज्य सरकारकडून ‘अनलॉक ४’ साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी राज्य सरकारने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. त्यामुळे लोकांना आता आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. याशिवाय खासगी आणि मिनी बसेसनाही परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मंदिरं आणि जिम यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत. जिम सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आलेली नाही. जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या गोष्टी सुरु होणार आहेत आणि कोणत्या बंद राहणार आहेत.