MaharashtraNewsUpdate : येत्या ३० सप्टेंबरपर्यंत शाळा , महाविद्यालये बंद मग परीक्षा घायच्या कशा ? उच्च शिक्षण मंत्र्यांचा सवाल

केंद्र सरकार म्हणते 30 तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लोक डाऊन मुळे बंद ..यूजीसी म्हणतy 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा. pic.twitter.com/ZcePitfl6T
— Uday Samant (@samant_uday) August 30, 2020
केंद्राकडून ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, विद्यापीठ , महाविद्यालये , कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. याबाबत उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , ‘केंद्र सरकार म्हणते ३० तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाऊनमुळे बंद ..यूजीसी म्हणते ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय? ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा?’ असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर याच मुद्द्यावरून काल उदय सामंत यांनी परीक्षा घेण्यासंदर्भात कुलगुरुंची एक बैठक घेऊन विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन सहज, आणि सुलभ पध्दतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.