Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार, पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस (वय ५४, रा. कडेगाव, जि. सांगली) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात मदत करण्याची बतावणी करून हसबनीस यांनी वारंवार बलात्कार केल्याची तक्रार २८ वर्षीय पीडित तरुणीने शुक्रवारी कडेगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास इस्लामपूरचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडे सोपवला आहे.

Advertisements

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास इस्लामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडे सोपवला असून अधिक तपास चालू आहे.

Advertisements
Advertisements

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षक विपिन हसबनीस हे वर्षभरापूर्वीच कडेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन आले आहेत. लॉकडाउनच्या काळात कारने कोल्हापुरातून कराडच्या दिशेने जाताना त्यांना कासेगाव बस स्थानकाजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत असलेली तरूणी दिसली. हसबनीस यांनी तरुणीला कराडपर्यंत लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान त्यांनी तिचा मोबाइल नंबर घेतला. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असल्याने तिला अभ्यासात मदत करतो अशी बतावणी केली. यानंतर वारंवार फोन करून कडेगाव येथील घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याचा उल्लेख पीडित तरुणीने फिर्यादीत केला आहे. हा प्रकार एप्रिल ते जुलै दरम्यान घडला. याबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकीही हसबनीस याने पीडितेला दिली होती. अखेर पीडित तरुणीने शुक्रवारी सकाळी कडेगाव पोलीस ठाण्यात निरीक्षक हसबनीस यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!