CoronaMaharashtraUpdate : शरद पवार यांनीही करून घेतली कोरोना टेस्ट , सिल्व्हर ओक मधील ५ जणांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी करोनाने शिरकाव केला आहे. ‘सिल्व्हर ओक’ येथील सहा जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. यानंतर शरद पवार यांचीही करोना चाचणी करण्यात आली असून अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवार यांना राज्यात फिरु नका अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सिल्व्हर ओकमधील दोन लोक आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी तीन लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत. संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचं काम करत असतात. त्यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे”. “दरम्यान शरद पवार यांची रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यांना काहीही समस्या नाही. ते अत्यंत सुरक्षित आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आपण त्यांना राज्यात फिरु नका अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हे सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकी यांच्या घरातील तसंच ज्या चाळीत राहतात तेथील लोकांची चाचणी केली जाणार आहे. त्यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सर्व गोष्टी केल्या जात आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सिल्व्हर ओकवर ज्या सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातील पाच जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती आहे तर एक जण स्वयंपाक करणारी महिला आहे. दरम्यान यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.
कराड दौऱ्यानंतर हे सुरक्षा रक्षक पॉझिटीव्ह आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान काल शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे. मंत्री बाळासाहेब पाटील पॉझिटिव्ह आल्यानंतर कराड दौऱ्यानंतर शरद पवार यांच्या स्टाफची अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात हे सहा कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. वरळी डोम इथे सर्वांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आता महापालिका सिल्वर ओक परिसरात फिव्हर कॅम्प घेणार आहे. रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील हे सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे.