IndiaNewsUpdate : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये धार्मिक दंगल , २ ठार ६० जखमी

Karnataka: Visuals from Bengaluru's DJ Halli Police Station area where violence broke out over an alleged inciting social media post.
Two people died & around 60 police personnel sustained injuries in the violence in Bengaluru, according to Police Commissioner Kamal Pant. pic.twitter.com/QsAALZycs0
— ANI (@ANI) August 11, 2020
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एका आमदाराच्या पुतण्याने सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्यामुळे उसळलेल्या धार्मिक हिंसाचारात दोन लोक ठार झाले असून एका पोलीस अधिकाऱ्यासह ६० लोक जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. पोलिसांनी हि आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या आमदाराच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट टाकली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळीत साडेसात वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समुदायातील शेकडो लोकांनी श्रीनिवास मूर्ती यांच्या घरासमोर गर्दी केली. संतप्त जमावाने मूर्ती यांच्या घारावर दगडफेक केली. एवढंचं नाहीतर तिथे असलेल्या 2-3 गाड्यांना आगही लावण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने आपाल मोर्चा डीजे हल्ली पोलीस स्थानकाकडे वळवला आणि तिथे तोडफोड केली.
दरम्यान पोलिसांना संतप्त जमावाची आक्रमकता आणि उफाळलेला हिंसाचार शांत करण्यासाठी फायरिंग करावी लागली. या फायरिंगमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. याबाबत काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडिया पोस्टवरून उफाळलेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अमीर-ए-शरीयतने देखील शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्याचे गृहमंत्री बासवराज बोम्मई यांनी या हिंसेत सहभागी असणाऱ्या लोकांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा दिला आहे.
Around 60 police personnel including an Additional Commissioner of Police injured in clashes that broke out over an alleged inciting social media post, in DJ Halli & KG Halli police station areas of Bengaluru, Karnataka: Police Commissioner Kamal Pant pic.twitter.com/WHp8WAbJct
— ANI (@ANI) August 11, 2020