महाराष्ट्रातील लॉकडाऊन पूर्णतः बंद करून सर्व व्यवहार पूर्ववत सुरु करा अन्यथा १० ऑगस्टनंतर आंदोलन : प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत कोरोनामुळे होणार मृत्यू दर आटोक्यात आणू, असं वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानावर ‘उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका’, अशी जळजळीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात केल्यानंतर महाराष्ट्रातील लॉकडाऊन पूर्णतः बंद करून सर्व व्यवहार पूर्ववत सुरु करा अन्यथा आम्ही १० ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे .
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले कि , ‘सुरुवातील कोरोना व्हायरसने सर्वांनाच भीती घातली. अमेरिकेच्या हाफकिनी संस्थेनं भारतात 40 टक्के लोकांना कोरोना होईल असं सांगितलं होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी भारतात जास्त कोरोनाचा प्रसार होणार नाही, भारतीय लोकांनी रोग प्रतिकार शक्ती ही चांगली आहे. असं म्हटलं आहे. त्यामुळे लोकं आता लॉकडाउनमध्ये उपाशीपोटी मरतील’, अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.राज्यातील सर्व व्यवहार हे पूर्वपदावर आणले पाहिजे. राज्यात लॉकडाउन वाढवू नका’, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. कोरोनाचा एवढा बाऊ कशाला? कोरोना नसतानाही हॉटस्पॉटमध्ये अधिक मृत्यू झाले असतील तर मग तरीही कोरोना लॉकडाऊन का माथी मारलं जातंय? 2020 सालच्या तुलनेत 2019 ला अधिक माणसं दगावली. मग 5 टक्के गंभीर बाधितांसाठी 95 टक्क्यांना का वेठीस धरता? असा रोखठोक सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
आम्हाला कायदा मोडण्यासाठी मजबूर करू नका? लॉकडाऊन उठलं नाहीतर 10 ऑगष्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरू, असा सज्जड इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आंबडेकर म्हणाले की, शासन निर्णय कलेक्टरवर सोडणं चुकीचं हे. मग शासन म्हणून सरकार नेमकं काय करतंय? एसटी मंहामंडळाची बस रस्त्यावर नेमकी कधी लावणार ते सांगा, अन्यथा 10 ऑगष्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरू आणि लॉकडाऊन तोडू, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
शासन काहीच पावलं उचलायला का तयार होत नाही आहे. या सरकारमध्ये निर्णय क्षमताच नाही तर राज्याचा आर्थिक गाडा नेमका कधी रुळावर येणार?, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लॉकडाऊनचे नियम मोठे गंमतीशीर आहेत. ते पहिले रद्द करा, माझा इशारा राज्य सरकारला आहे. केंद्रालाही देऊ नंतर असंही आंबेडकरांनी यावेळी सांगितलं. मुंबईत आज पावसानं दाणादाण उडवली आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शासनाने काही निर्णय लोकांवरही सोडावेत. तुम्ही शाळा सुरू करा, मुलांना पाठवायचं की नाही हे पालकांना ठरवू द्या. तसेच विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा या झाल्याच पाहिजेत, असं मतही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं.