Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurCoronaNewsUpdate : कोरोनाबाधित गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला आणि तिने जगाचा निरोप घेतला…

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपुरातील कोरोनाबाधित  गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला खरा पण डॉक्टर या महिलेला वाचवू शकले नाही.  ही गर्भवती महिला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी मेयोत उपचाराला आली होती. तिला प्रसववेदना होत असल्याने मेयोतील कोविड रुग्णालयाने तातडीने उपचारासाठी दाखल केले. गरोदरपणातील उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या या महिलेला मेयोतील टीमने तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून घेत कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीवर उपचार सुरू केले. असह्य प्रसवकळा येत असल्याने तिला तातडीने लेबर रूममध्ये शिफ्ट करण्यात आले.

Advertisements

दरम्यान रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रवी चौहान, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तोवर तिच्या घशातील स्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेच्या आधारे तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यादरम्यानच्या काळात तिने बाळाला जन्म देताच अवघ्या काही क्षणांतच तिने जगाचा निरोप घेतला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!