MaharashtraPoliticalUpdate : भाजपचा अजूनही महाराष्ट्राच्या सत्तेवर डोळा , सेनेसोबत पुन्हा जाण्याची तयारी…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आपल्या पद्धतीने कारभार चालवीत असताना प्रदेश भाजपच्या मनातून मात्र आपली सत्ता गेल्याचे शल्य काही केल्या कमी होत नाही. अधून मधून भाजप नेत्यांना सत्तेचा उमाळा येतोच येतो . दरम्यान प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला असला तरी राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्याच लढणार, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मी आम्हा सगळ्यांचं सामूहिक मानस व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी “एबीपी माझा”शी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की, “एकत्र निवडणूक लढवायच्या, मोदींच्या व्होटबँक, त्यांनी केलेल्या कामाचा फायदा घ्यायचा. मग तुम्ही विरोधी पक्षात राहिला असता तर चाललं असतं. ज्यांच्याविरोधात लढलात, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं.” चौथीतल्या मुलगाही सांगेल की सध्याचं सरकार राज्याचं हित पाहत नाही, असंही पाटील म्हणाले.