CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 4120 रुग्णांवर उपचार सुरू, एका रुग्णाची वाढ, दिवसभरात 6 मृत्यू

UPDATE : 3:33 PM
जिल्ह्यातील एका रुग्णाचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत 13105 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8536 बरे झाले, 449 जणांचा मृत्यू झाला. तर 4120 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण
ग्लोरिया सिटी, पडेगाव (1)
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत सिल्क मिल कॉलनीतील 40, राहतपटी तांडा, जटवाडातील 52, पुंडलिक नगरातील 54, भावसिंगपुऱ्यातील 52 वर्षीय पुरूष आणि जय भवानी नगरातील 70 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात सिल्लोडमधील डॉ. झाकीर हुसेन नगरातील 50 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.