अयोध्यातील राम मंदिराच्या भूमिपूजन दिनी राज्यातील सर्व मंदिरांना उघडण्याची परवानगी देण्याची भाजप नेत्याची मागणी

भगवान राम यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्यामध्ये राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला होणार असल्याने राज्यातील राम भक्तांना या आनंदात सहभागी होता यावे म्हणून राज्यातील सर्व मंदिरं 5 ऑगस्टला उघडण्यासाठी परवाणगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे भाजप नेते संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. इच्छा असूनही कोरोना कालावधीत महाराष्ट्रातील रामभक्त अयोध्येत पोहोचू शकत नाहीत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम ठेवत सर्व मंदिरं खुली करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज्यात कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून संपूर्ण देशात धार्मिक स्थळं बंद आहेत. पण संजय पांडे यांनी पत्रात 5 ऑगस्टला महाराष्ट्रात राम भक्तांसाठी मंदिर खुली करण्याची मागणी केली आहे.