CoronaNewsUpdate : केवळ ताप येणे हे कोरोनाचे मुख्य लक्षण नाही, AIIMS च्या अभ्यासातून झाले स्पष्ट

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून (AIIMS) करण्यात आलेल्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ताप येणे हे कोरोनाची लागण होण्याचे प्रमुख लक्षण कधी नव्हते असे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित अभ्यासातून हे स्पष्ट झाले असल्याचे वृत्त आहे. मार्च-एप्रिल या कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसात केवळ 17 टक्के रुग्णांना ताप होता. दिल्लीस्थित एम्समध्ये 23 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या 144 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. उत्तर भारतातील एका केअर सेंटरमध्ये दाखल केलेल्या कोरोना रुग्णांची प्रोफाइल आणि रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या रिसर्चमध्ये 28 अन्य लोकांसह संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी एकत्र येऊन लिहिलं आहे. News18 ला या शोध पत्रातून ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार केवळ 17 टक्के रोगींना तापाचं लक्षण होतं. जे जगभरातील अनेक रिपोर्टच्या तुलनेत खूप कमी आहे. ज्यामध्ये चिनी कोहॉर्ट सहभागी होतं.