HumanityNewsUpdate : नीतिमत्तेच्या गप्पा मारणारांचे रतन टाटा यांनी असे उपटले कान !!

कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद आहेत. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहे. पगार कपात करत आहेत. यावर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. हे तेच लोक आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केल आहे, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितीमत्तेची व्याख्या आहे का? असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.
दरम्यान कोरोनाच्या निमित्ताने अनेकांची मानसिकता उघड होत आहे. ज्या कामगारांच्या जीवाववर उद्योजकांनी आपल्या उद्योगाची व्यवसायाची प्रगती केली त्यांनाच कोरोनाच्या संकट काळात नीतिमत्तेच्या , नैतिकतेच्या गप्पा मारणारे लोक वाऱ्यावर सोडत आहेत. अशा लोकांची अप्रत्यक्ष कान उघाडणीच रतन टाटा यांनी केली आहे. परंतु शेवटी ज्या लोकांच्या मनातच मानवता नाही त्या लोकांना टाटांच्या बोलण्याचे सार कसे कळणार ? लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपल्याच कामगारांना कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने अनेक लोक उद्ध्वस्त झाले. तरीही असे वर्तन करणाऱ्या लोकांचे मन द्रवले नाही.
या विषयावर बोलताना रतन टाटा यांनी , उद्योजक आणि कंपन्यांसाठी दीर्घकाळ काम करणे आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता सर्वोतोपरी असते. कोरोनाच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचार्यांशी असे वागता, ही तुमची नैतिकता आहे का? असा सवाल त्यांनी युवरस्टोरीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. रतन टाटा म्हणाले की, जेव्हा देशात विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा हजारो लोकांना काढून टाकण्यात आले. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल का? मला नाही वाटत की असे होईल, कारण तुम्हाला व्यवसायात नुकसान झाले आहे, अशात लोकांना नोकरीवरून काढणे योग्य नाही. उलट त्या लोकांबद्दल आपली जबाबदारी असते, असं ते म्हणाले. तुम्ही या वातावरणात तोपर्यंत टिकणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही संवेदनशील होत नाहीत. तुम्हाला लपण्यासाठी किंवा पळण्यासाठी कोणतीही जागा नाही. तुम्ही जेथे जाल तिथे कोरोना महामारीमुळे नुकसान होईल. यामुळे तुम्ही परिस्थिती स्वीकारणे चांगले राहील. तुमच्यामुळे जे काही होईल, त्या गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, असंही रतन टाटा म्हणाले.