Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneCoronaNewsUpdate : पुण्यातही कोविडग्रस्त महिलेचा विनयभंग , तक्रार मिळूनही पोलीस का झाले हतबल ? आरोपीला अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमधील महिला रूग्णांच्या विनयभंग प्रकरणी धक्कादायक बाब उघड झाली आहे.  विनयभंग करणारा आरोपी हाया या सेंटरचा कर्मचारी असल्याचे तपासात उघड  झाले आहे. लोकेश मते असे  आरोपी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी याच कोविड सेंटरमधील कर्मचारी असून त्याने आपला मोबाइल नंबर घेऊन मेसेजही पाठवले आणि रात्री 12 वाजता रुमचा दरवाजाही ठोठावला असं तक्रारदार महिलेनं FIRमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती,  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे PI विष्णू ताम्हाणे यांनी दिली.

Advertisements

सदर महिलेने दिलेल्या माहितीनुसार सिंहगड कॉलेज कोविड सेंटरमध्ये काल राञी 12 वाजता एका महिला पेशंट्सच्या दारावर जोरदार धक्के मारले गेल्याचा प्रकार घडला. संबंधित महिलेनं घाबरून 100 नंबरवर कॉल करून तक्रारही केली पण पोलिसांकडे पीपीई कीट नसल्याने त्यांनी कोविड सेंटरमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली. आज या पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या महिलेची दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमध्ये असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये मध्यरात्री 27 वर्षीय कोरोना बाधित महिला राहत असलेल्या रूमचा दरवाजा बाहेरून त्या व्यक्तीने जोरजोराने ठोठवल्याची घटना घडली. संपूर्ण रात्र जागूनच घाबरलेल्या अवस्थेतच त्या महिलेने काढली. सकाळी तिने ही बाब आपल्या नातेवाईकांना फोनवरून सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर त्या महिलेला दुसऱ्या कक्षात इतर महिलांसोबत राहण्यास पाठविले.

Advertisements
Advertisements

सिंहगड कॉलेजमध्ये एकूण 5 हॉस्टेल प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी 1500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 14जुलै रोजी धायरी येथील 27वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाच्या वतीने त्या महिलेस वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज च्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विनयभंगाचा प्रकार हा अत्यंत भयानक व गंभीर असून महिलेच्या सुरक्षेसाठी चिंताजनक आहे. अशा कर्मचाऱ्याला कठोर शासन झाले पाहिजे. यासाठी महापालिका आयुक्त यांनी विशेष लक्ष घालून, तपास करून संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!