MadhyaPradeshUpdate : विकास दुबेच्या अटकेचा थरार आणि त्याला जेरबंद करणारी लेडी सिंघम….

उत्तर प्रदेशातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रूर हत्येला जबाबदार असणाऱ्या विकास दुबईला अटक करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. हे आव्हान समर्थपणे पेलत महाकाल मंदिराची सुरक्षा अधिकारी रुबी यादव यांनी दुबेला जेरबंद केल्यांनतर रुबी यादव यांनी आज एका न्यूज चॅनलला अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड केल्या. त्या म्हणाल्या कि , त्यांची टीम सकाळी 7.15 च्या सुमारास राऊंडवर होती, विकास दुबेसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला फुलवाल्याने पाहिले. त्याने याबाबतची माहिती आमच्या टीमला दिली. त्यानंतर मी माझ्या टीमला सांगितले जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत पकडायचे नाही. विकास दुबे बाहेर फिरत होता आणि तो काहीही करू शकला असता. मग आमची टीम त्याच्या मागे गेली. त्याने 250 रुपयांचे तिकीट घेतले आणि शंख गेटने प्रवेश केला, तोपर्यंत आमच्या टीमने त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती.
दरम्यान मी माझ्या सुरक्षा रक्षकाला विकास दुबेचा एक फोटो पाठविण्यास सांगितले, माझ्याकडे आलेल्या फोटोमध्ये त्याचा चेहरा वेगळा होता. त्याने आपले केस लहान केले होते, चष्मा आणि मास्क लावला होता. शिवाय तो बारीकही दिसत होता. त्यामुळे त्याचा चेहरा पाहून ओळखणे कठीण झाले होते. मी माझ्या टीमला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले. जेवढ्या काळात त्याने दर्शन घेतले त्यावेळास मी गुगल करुन त्याचे फोटो तपासून घेतले. गूगल सर्चमधील वॉन्टेड फोटोच्या डोक्यावर डाग होता. जेव्हा माझ्या गार्डने पाठविलेले चित्र मी पाहिले तेव्हा मी झूम करुन पाहिले तर त्याच्याही कपाळावर जखम होती. यानंतर मला खात्री झाली की हा विकास दुबे आहे, परंतु कोणीही पॅनिक होऊ नये म्हणून मी ही गोष्ट माझ्या टीमला सांगितली नाही.
माझ्या लक्षात हि गोष्ट आल्यानंतर मी एसपी साहेबांना फोन करून माहिती दिली. मी माझ्या सुरक्षा रक्षकांना सांगितले की तुम्ही त्याला लाडूच्या काउंटरवर बसवा आणि आम्ही त्याला पहात आहोत याविषयी त्याला शंका येऊ देऊ नका. मी सुरक्षा रक्षकांना सांगितले की तुम्ही त्याला ओळखपत्राविषयी विचारा आणि तर इतर कामे करा. त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव शुभम सांगितले आणि खिशातून आयकार्ड काढला. या कार्डावर त्याचे नाव नवीन पाल होते. तो बनावट आय कार्डद्वारे गुंडगिरी करत फिरत होता. मंदिरमध्ये त्याने मी विकास दुबे असल्याचे कबूल केले. या दरम्यान त्याने आमच्या एका सहकाऱ्यासोबत झटापटही केली. त्याने एका गार्डाची नेम प्लेट काढली आणि त्याचं घड्याळही तोडलं. त्यानंतर एसपी आणि स्थानिक पोलीस आल्याने त्याला तातडीने अटक करण्यात आलं.