CoronaIndiaUpdate : देश : धक्कादायक : दर तासाला सरासरी एक हजार जण होताहेत कोरोनाबाधीत….

भारत में पिछले 24 घंटों में 613 मौतें और 24,850 नए #COVID19 के सर्वाधिक मामले सामने आए हैं ।कुल पॉजिटिव मामलों की संख्या 6,73,165 है जिसमें 2,44,814 सक्रिय मामले, 4,09,083 ठीक / डिस्चार्ज / माइग्रेट और 19,268 मौतें शामिल हैं: स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय pic.twitter.com/JPGntm2GVS
— ANI_HindiNews (@AHindinews) July 5, 2020
भारतात तर दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरूच असून देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यांचे नवीन रेकॉर्ड होत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 24 तासांमध्ये 24 हजार 850 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 613 लोकांचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे रुग्ण सुधारण्याचा दर 60 टक्क्यांवर असला तरी , देशात कोरोनामुळे 24 तासांत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोहोचली आहे. त्यापैकी 4 लाख 09 हजार 083 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मते, 4 जुलै रोजी, 2, 48, 934 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. देशात आतापर्यंत 9789066 लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्र
दरम्यान महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येने हादरुन गेला आहे. मागच्या 24 तासांत राज्यात 7074 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 200064 वर गेली आहे. शनिवारी 295 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 8671वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या 83237 वर गेली असून फक्त मुंबईत आत्तापर्यंत 4830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.