“हायब्रीड” राहुल गांधींकडे ते जाणवेधरी असल्याचा पुरावा काय ? : केंद्रीय मंत्री हेगडे

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. मात्र मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मुस्लिम वडिल आणि ख्रिश्चन आई असलेल्या राहुल गांधींकडे हिंदू असल्याचा काही पुरावा आहे का? राहुल गांधी स्वतःला कशाच्या जिवावार जानवेधारी हिंदू म्हणवतात? असा प्रश्न केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे भ्याड हल्ला झाला. या हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाले. ज्यानंतर भारताने १२ दिवसांनी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. या हल्ल्यामध्ये दहशतवादी तळ उद्धवस्त झाले तसे २०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले असा दावा अमित शाह आणि इतर भाजपा नेत्यांनी केला. मात्र याचे पुरावे मागितले जाऊ लागले. राहुल गांधी यांनीही यासंदर्भात पुरावे द्या असं म्हटलं. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी ही घणाघाती टीका केली आहे. कर्नाटकातील सिरसी या ठिकाणी झालेल्या एका संमेलनात हेगडे बोलत होते. राहुल गांधी हे हायब्रीड आहेत अशीही टीका त्यांनी केली.

Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!