मसुद अझरचा उल्लेख राहुल गांधींनी अझरजी केला आणि भाजप तुटून पडली …

दहशतवादी मसुद अझरचा उल्लेख काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना मसुद अझरजी असा केल्यामुळे नभाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे . “मसुद अझर हा दहशतवादी आहे, त्याला राहुल गांधी हे “जी” असे संबोधन कसे काय लावू शकतात ? असा भाजप नेत्यांचा आक्षेप आहे.
मोदीसरकार विरोधात बोलण्याच्या ओघात अजित डोवाल हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत मग ते विमानात बसून मसुद अझरजींना सोडवण्यास कसे गेले होते? असे उदगार राहुल गांधी यांनी काढले होते हे भाषण ऐकताच भाजपने राहुल गांधींवर टीकेचे ताशेरे झोडण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही राहुल गांधी आणि पाकिस्तान या दोघांमध्ये एक साम्य आहे असे म्हटले आहे. ते साम्य म्हणजे दहशतवाद्यांबद्दल वाटणारे प्रेम आहे असे ट्विट स्मृती इराणी यांनी केले आहे.