MaharashtraNewsUpdate : राज्यातील लॉकडाऊनला ३१ जुलैपर्यंत वाढ , जाणून घ्या काय आहेत बदल ?

Maharashtra Government extends lockdown in the state till 31st July. pic.twitter.com/reUYA00uXI
— ANI (@ANI) June 29, 2020
महाराष्ट्रत लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. Unlock झाल्याने गर्दी वाढली असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे.
दरम्यान या आदेशानुसार MMR परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही. अत्यावश्यक सेवेसाठी लोकांना जाता येईल. मात्र अनावश्यक गर्दी करता येणार नाही. व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी सर्व नियमांचं पालन करणं सक्तिचं करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हे सक्तिचं करण्यात आलं आहे. कोरोना तुमच्या दारातच उभा आहे. गाफील राहू नका असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादात सांगितलं होतं.
मागील आदेशाप्रमाणेच जिल्ह्यांतर्गत व्यवहारांना परवानगी दिलेली आहे. मात्र अजुनही जिल्हाबंदी कायम असून विनापरवाना प्रवास करता येणार नाही. सलून, स्पा, ब्युटी पार्लर यांनी नियमांचं पालन करतच दुकाने सुरू करावीत असेही नव्या आदेशात म्हटलं आहे. लग्नासाठीही पूर्वीचेच नियम लागू होणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईसह ठाण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीत 11 जूनपर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल आणि दुध डेअरी सुरू राहणार आहे.