CoronaEffectUpdate : जळगाव जिल्ह्यात नवरदेव नवरीसह १६ जणांना कोरोनाची बाधा ,  नवदाम्पत्यावर थेट कोरोना रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ !!

Advertisements
Advertisements
Spread the love

जळगाव जिल्ह्यात नवरदेव-नवरीसह एकाच कुटुंबातील 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे या  नवदाम्पत्यावर थेट कोरोना रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील विखरण गावात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे पाहायला मिळत असल्याने तो नियंत्रित करण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शासनाच्या उपाय योजनाकडे काही नागरिक गंभीरतेने घेत नसल्याने हे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

Advertisements

या विषयीची अधिक माहिती अशी कि, विखरण या गावात 14 जून रोजी एका पोलीस कर्मचाऱ्याचा विवाह पार पडला होता. या विवाहाच्या दरम्यानच या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची किरकोळ लक्षणे आढळून आली होती. मात्र, किरकोळ लक्षणे असल्याने त्याकडे कोणीही गंभीरतेने घेतलं नाही. मात्र लग्नानंतर 5-6 दिवसांनी नवरदेवाची तब्बेत बिघडली. नवरदेवाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या जवळच्या नातेवाईकांची ही तपासणी करण्यात आली. आता नवरी, फोटोग्राफरसह एकूण 16 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या लग्नात 100 हून अधिक इतरही वऱ्हाडी उपस्थित होते. आणखी काही नातेवाईकाचीही तपासणी होणार आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान कोरोनाची लक्षणे आढळताच वेळीच नवरदेवाने चाचणी करून घेतली असती. आणि  लग्नात गर्दी गोळा केली नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसता.  विवाह समारंभाला मुभा देण्यात आलेली असली तरी कोरोनाचा प्रसार वाढू नये, या साठी शासनाच्या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारे कोणी त्याच उल्लंघन करीत असेल तर त्यावर यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!