सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशावरून मुख्यमंत्र्यांच्या समोरच गोंधळ

सुजय विखे पाटलांच्या संभाव्य भाजप प्रवेशाविरोधात नगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून मुंबई भाजप कार्यालयात दिलीप गांधी समर्थकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सुजय विखे पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्री नाराज झाल्याचं कळतं. दरम्यान, आज अहमदनगरचे विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी समर्थकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सुजय विखे पाटील यांना उमेदवारीला देण्यास विरोध केला.