AurangabadNewsUpdate : पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचा मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

औरंगाबाद – सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचा कोरोना वाॅरियर्स म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशस्तीपत्राद्वारे गौरव केला.
आ.अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गौरवोग्दार काढलेले प्रशस्तीपत्र एका छोट्या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक गिरी यांना बहाल केले.या प्रशस्तीपत्रात मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की, गिरी यांनी कोरोना संक्रमण णकाळात जी सेवा बजावली आहे ती छत्रपती शिवाजी महारांच्या चरणी रुजु झाली असून शहरातील जनता जनार्दनाची मनोभावे आपण सेवा केली.