News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

१. देशात सर्वत्र आदर्श आचार संहितेचा अंमल:२४ तासांच्या आत राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स काढा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
२. मुंबई – महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 73 लाख मतदार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती
३. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला मोठ्या संख्येने मतदानाचे आवाहन
४. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना सज्ज, मुख्यमंत्र्यांनी केले निवडणुकांच्या तारखांचे स्वागत
५. जम्मू-काश्मीरः पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
६. मुंबईः तिसरा स्ट्राइक हा देशातील नागरिक विरोधकांवर करतीलः सुषमा स्वराज
७. मध्यप्रदेश: राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी ओबीसी प्रवर्गासाठी असलेले आरक्षण २७ टक्के करण्याच्या अध्यादेशाला दिली मंजुरी
८. गडचिरोली – नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या, कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील संध्याकाळची घटना
९. अकोला : तेल्हारा शहरातील संभाजी चौक येथे रमेश हागे नावाच्या व्यक्तीची हत्या.
१०. मेक्सिकोतील नाईटक्लबमध्ये गोळीबार; 15 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी