AurangabadCrimeUpdate : तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍याला बेड्या, दुसरा आरोपी घाबरुन रुग्णालयात दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – सिडको एन ७ परिसरातील तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या दोघांविरुध्द सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला बेड्या ठोकल्या आहे.तर दुसरा आरोपी साथीदाराला अटक झाल्याचे कळतांच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.
अशोक माधव गायकवाड(३५) रा.त्रिवेणीनगर सिडको एन७ असे अटक आरोपीचे नाव असून अंबादास संतोष गायकवाड(६०) रा.एन७सिडको असे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
१८जून रोजी सिडको एन७परिसरातील प्रतिक्षा भरत काळे हिने दुपारी दीड वा. राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. प्रतिक्षा भरत काळे  ही शिक्षिका होती. व सुसाईड नोट मधे अशोक गायकवाड आणि अंबादास शिरसाठ हे तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे नमूद केले.या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी वरील दोघांवर कारवाई केली आहे. अंबादास शिरसाठ कडून मयत प्रतिक्षा काळे हिने लाॅकडाॅऊनच्या काळात आर्थिक अडचणी आल्याने व्याजाने ४० हजार रु.घेतले होते.पण लाॅकडाऊन वाढल्यामुळे शिरसाठ चे पैशे परत करण्यास उशीर होत होता. तरीही आरोपी शिरसाठ हा पैशासाठी तगादा लावंत असल्यामुळे प्रतिक्षाने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी करंत आहेत

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!