IndiaNewsUpdate : देश जवानांचं बलिदान कधीही विसरणार नाही- राजनाथ सिंह, जाणून घ्या शहिद जवानाची यादी

Army vehicles stop at a base camp in Leh in the cold desert region of Ladakh, 434 kms from Srinagar. The peaks in Kargil area of Ladakh witnessed a war between Indian soldiers and the soldiers of the neighbouring Pakistan in the summer of 1999. Express Photo By Shuaib Masoodi, 05.07.2014.
The loss of soldiers in Galwan is deeply disturbing and painful. Our soldiers displayed exemplary courage and valour in the line of duty and sacrificed their lives in the highest traditions of the Indian Army.
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) June 17, 2020
चीन ने भारतीय सैन्यावर अचानक भ्याड हल्ला केल्यामुळे सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करताना म्हटले आहे कि , “भारतीय सैनिकांचं वीरमरण दु:खद आणि व्यथित करणारं आहे. आपल्या जवानांनी असामान्य शौर्य़ दाखवलं आणि देशासाठी शहीद झाले. देश जवानांचं शौर्य आणि बलिदान कधीही विसरणार नाही. संपर्ण देश शहीदांच्या कुटुंबियांसोबत आहे.”
भारत-चीन वाद नेमका काय आहे?
अचानक चर्चेत आलेल्या या प्रकरणामुळे लडाखमधल्या गलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहोचली. या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्याने वाद पेटला. या आधी भारत-चीनचे २५०जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले होते.
भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या हिंसक झडपते भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं आहे. यामध्ये कमांडिंग अधिकारी कर्नल संतोष बाबू यांचाही समावेश आहे. चीनच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं. या हल्ल्यात चीनचे ४० हून अधिक सैनिक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहीद झालेल्या जवानांचं बलिदान कधीही विसरणार नाही. संपूर्ण देश शहिदांच्या कुटुंबियांसोबत आहे, असं सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं.