CoronaEffectNewsUpdate : कोरोनाच्या संशयाने आयकर अधिकाऱ्याने स्वतःवर झाडल्या गोळ्या

कोरोनाच्या संशयावरून इनकम टॅक्सच्या अतिरिक्त कर संचालकांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण आयकर विभागाला धक्का बसला आहे. शिवराज सिंह (वय 56) असं आत्महत्या करणाऱ्या कर संचालकांचं नाव आहे. दिल्लीमध्ये द्वारका सेक्टर 6 मध्ये राहत्या घरी स्व:ला गोळी घालत त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आत्हमत्या करण्याआधी त्यांनी एक सुसाईड नोटदेखील लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं धक्कादायक कारण लिहिलं आहे. कोरोना झाल्याची शंका असल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साडेसहा वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.