चर्चेतली बातमी : सुशांतच्या आर्थिक स्थितीविषयी आली हि माहिती , आत्महत्येच्या कारणांचा शोध घेताहेत पोलीस

बॉलिवूड अभिनेता सुशांतच्या मृत्यूच्या कर्णाचा तपस केला जात असताना त्याला नेमकं नैराश्य कशाचं होतं याचा शोध घेतला जात आहे . दरम्यान त्याच्या आर्थिक स्थितीची माहिती लक्षात घेता कुठलेही आर्थिक संकट सुशांतवर नव्हते असा खुलासा झाला आहे . प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची व्यक्तीरेखा साकारणारा सुशांत सिंह राजपूत याने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला होता. सुशांतने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.
दरम्यान सुशांतचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. रविवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. यात सुशांतचा मृत्यू हा गळफास लागल्यामुळेच झाला असं अहवालात स्पष्ट झालं आहे. सुशांतने आपल्या सिनेकरिअरमध्ये जास्त प्रमाणात सिनेमे साकारले नव्हते. पण, तो एक यशस्वी अभिनेता म्हणून समोर आला होता. त्यानं टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोणी यांच्या कारकिर्दीवर एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात माहीची मुख्य भूमिका साकारली होती.
सुशांतची आर्थिक परिस्थिती
ज्या चित्रपटाने तो अधिक झोतात आला त्या ‘एमएस धोनी’ सिनेमाने 220 कोटींची कमाई केली होती. या सिनेमामुळे सुशांतच्या अभिनयाचा ठसा उमटला होता. सुशांत हा चांगला अभिनेता तर होता, त्यासोबत तो एक उत्तम डान्सर आणि अनेक रिअॅलिटी शोमध्ये त्याने अँकरिंगही केलं होतं. सुशांत एका सिनेमासाठी 5 ते 7 कोटी मानधन घेत होता. तर जाहिरातीसाठी तो 1 कोटी रुपये घेत होता. त्याने रिअल इस्टेट प्रॉपर्टी क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. त्याची एकूण संपत्तीही 80 लाख डॉलर म्हणजे 60 कोटी पेक्षा जास्त होती. एमएस धोनी सिनेमाने 220 कोटींची कमाई केली होती. सुशांतने सिनेमे,जाहिराती आणि गुंतवणुकीतून कोट्यवधीची संपत्ती जमवली होती.
हाताशी आलेल्या माहितीनुसार बॉलिवूडच्या इतर सेलिब्रेटीप्रमाणेच सुशांत हा वांद्रे येथील आलिशान घरात राहत होता. त्याला कार आणि स्पोर्ट्स बाईकचा छंद होता. त्यामुळे त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या होत्या. यात मसेराटी क्वाटरोपोर्ते, लँड रोव्हर रेंज रोवर एसयूवी, बीएमडब्ल्यू के 1300 आर स्पोर्ट बाईक आणि इतर गाड्या होत्या. सुशांत हा मुळचा बिहारचा राहणारा होता. त्याचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी पटना इथं झाला होता. सुशांतची इंजीनिअर व्हायची इच्छा होती. अभ्यासातही तो हुशार होता. सुशांतने सन 2003 मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया सातवे रॅकिंग प्राप्त केले होते. नंतर सुशांत सिंहने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये ( दिल्ली टेक्निकल यूनिव्हर्सिटी) मॅकॅनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास सुरू केला होता. मात्र, कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांतच त्यानं शिक्षण अर्ध्यात सोडलं आणि अॅक्टिंग शुरू केली होती. नंतर सुशांतनं अल्पावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.
साडेचार लाखाच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता सुशांत
सुशांत एका डिलक्स अपार्टमेन्टमध्ये रहायचा. तिथे एकून चार फ्लॅट होते. या घरासाठी सुशांत महिन्याला लाखो रुपयांचं भाडंही द्यायचे. एवढंच नाही तर मीडिया रिपोर्टनुसार डिपॉझिट म्हणून सुशांतने या घरासाठी १२ लाख ९० हजार रुपयांचं डिपॉझिटही दिलं होतं. तर महिन्याला ४ लाख ५१ हजार रुपये तो भाडं द्यायचा. असं म्हटलं जातं की, २०२२ पर्यंत सुशांत या घरात राहणार होता.
दरम्यान सुशांतच्या चुलत भावानं एक धक्कादायक खुलासा केलाय. पूर्णिया जिल्ह्यातील मलडिहामध्ये राहणाऱ्या पन्ना सिंह यांच्या दाव्यानुसार, सुशांत सिंह राजपूत याच वर्षी बोहल्यावर चढणार होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याच्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याची कुटुंबीयांची तयारी सुरू होती. परंतु, सुशांत कुणासोबत विवाहबद्ध होणार होता, हि माहिती मात्र उघड झाली नाही. ‘गेल्या आठवड्यात सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांच्याशी बोलणं झालं होतं. जवळपास ४५ मिनिटे हा संवाद सुरू होता. त्यांनी सर्व काही ठिक असल्याचं सांगितलं होतं. सुशांतचं नोव्हेंबर महिन्यात लग्न आहे, मुंबईला जायचंय, तयारी करून ठेवा, असंही त्यांनी म्हटलं होतं’ असं पन्ना सिंह यांनी म्हटलं आहे .