CrimeNewsUpdate : आईने रागाच्या भरात चार वर्षाच्या चिमुरडीसोबत असे कृत्य केले कि , तिला आता जन्माची अद्दल घडणार !!

केवळ अंडी फोडल्याच्या रागातून आईने चार वर्षाच्या चिमुरडीचे भिंतीवर डोके आदळल्याने जागीच मृत्यू झाला तेंव्हा तिने आधी या चिमुरडीचा मृतदेह पलंगाच्या खाली आणि नंतर शेजाऱ्याच्या छतावर टाकून मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यासाठी स्वतःच पोलीस ठाण्यात गेली खरी पोलिसांनी आपला हिसका दाखवताच तिने आपला गुन्हा काबुल केला . उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली . काही दिवसांपूर्वी शेजाऱ्याच्या घराच्या छतावर एका चार वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. या चिमुरडीची हत्या तिच्या आईनंच केली हे पोलिसांनी आपल्या तपासात उघड केले तेंव्हा हे लक्षात आले कि , या चिमुरडीकडून अंडी फुटल्याच्या कारणावरून या मुलीचा जीव गेला.
केवळ अंडी फोडली म्हणून तिच्या आईचा राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात तिनं मुलीचं डोकं भिंतीवर आपटलं. यात तिचा जागीच मृत्यू झाला आणि गुन्हा लपवण्यासाठी या मारेकरी आईने आधी घरातील पलंगाच्या खाली आणि नंतर मुलीचा मृतदेह शेजारच्या घराच्या छतावर ठेवला. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर तिचा शोध घेत असतानाच, शेजारच्या घराच्या छतावर तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्या घरातील पती, पत्नी आणि त्यांच्या मुलाला ताब्यात घेतलं होतं.
पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. ‘कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इचौली गावातील रामसिंहची चार वर्षीय मुलगी पायल ३ जून रोजी संध्याकाळी बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. त्याचवेळी रामसिंहच्या शेजारी राहणाऱ्या दिनेशच्या घराच्या छतावर मुलीचा मृतदेह सापडला,’ असं पोलिसांनी सांगितलं. आरोपी रेखानं हत्येची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. तिला न्यायालयात हजर केलं असता, पोलीस कोठडी सुनावली आहे. तर शेजारी दिनेश आणि त्याची पत्नी, मुलाची सुटका करण्यात आली आहे.