Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : तब्बल पाच महिन्यानंतर चोरटा अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – फेब्रूवारी महिन्यात कारगिल मैदानासमोर रात्री १०अडवून मोबाईल रोख रक्कम व मोटरसायकल हिसकावून पळ काढणार्‍या चोरट्यास पुंडलिकनगर पोलिसांनी गजानन नंदीर परिसरातील एस्सार पेट्रोलपंपावर काल अटक केली.न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात शिवाजीनगर परिसरात राहणारा विकास भारकड (२३) या तरुणाला आरोपी शेख इरफान शेखलाल(२५) याने त्याच्या दोन साथीदारासह मारहाण करंत भारकड कडील मोटरसायकल, मोबाईल आणि पैशे घेऊन पळून गेला होता.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.वरील कारवाईत पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरे,शिवाजी गायकवाड, प्रविण मुळै यांनी सहभाग घेतला होता.पीएसआय प्रभाकर सोनवणे हे एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करंत आहेत

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!