MaharashtraCoronaUpdate : राज्यातील एकूण रुग्णसंख्या ९७ हजार ६४८ वर , एकूण मृत्यूची संख्या ३ हजार ५९०

काही केल्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत नसून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडाही दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात दिवसभरात १५२ करोनाबाधित दगावले असून राज्यात मुंबईत सर्वाधिक ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे कि , आज दगावलेल्या १५२ मृतांपैकी ३५ रुग्णांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर इतर रुग्णांचा मृत्यू १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीत ११७ जण दगावले. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ३ हजार ५९० झाली आहे. राज्यात आज ३ हजार ६०७ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील एकूण रुग्णसंख्या ९७ हजार ६४८ वर गेली आहे. त्याशिवाय आज १ हजार ५६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने करोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ४६ हजार ७८ झाली आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज दगावलेल्या १५२ रुग्णांपैकी ९७ रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मिरा-भायंदर येथे ९, कल्याण-डोंबिवलीत ७, नवी मुंबईत ४, वसई-विरारमध्ये २, नाशिकमध्ये ५, औरंगाबादमध्ये ६, लातूरमध्ये २, पुणे आणि सोलापुरात प्रत्येकी ८, रत्नागिरी, हिंगोली, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. दरम्यान आज दगावलेल्या रुग्णांमध्ये १०२ पुरुष आणि ५० महिलांचा समावेश आहे. तसेच मृतांपैकी ६० वर्षांवरील ८५, ४० ते ५९ वयोगटातील ५४ आणि ४० वर्षांखालील १३ रुग्णांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी १०७ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार होते, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे कि , आज दगावलेल्या १५२ मृतांपैकी ३५ रुग्णांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर इतर रुग्णांचा मृत्यू १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीत ११७ जण दगावले. त्यात मुंबईतील ८७, मिरा भाईंदर येथील ८, कल्याण-डोंबिवली आणि सोलापूर येथील प्रत्येकी ७, नवी मुंबईतील ४, नाशिकमधील ३ आणि वसई-विरारमधील एकाचा समावेश आहे. राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली.