CoronaEffect : नवी बातमी : फेस मास्क विषयी WHO ने जारी केली हि माहिती…

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावणे सर्वत्र बंधनकारक आणि सक्तीचे करण्यात आले असले तरी जागतिक आरोग्य संघटनेने चेहऱ्यावर मास्क लावण्याबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. WHO ने जारी केलेल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे की , गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन ज्या ठिकाणी होत नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक आहे.

Advertisements

एका कपड्याचा मास्क हा कोरोनापासून बचाव करेलच हे सांगता येत नाही, तीन लेअर असाव्यात…

Advertisements
Advertisements

नवीन गाईडलाईनमध्ये  हे मास्क कसे असावेत आणि त्यासाठी कोणतं साहित्य वापरण्यात यावं याबाबतही माहिती देण्यात आली आहे. हे मास्क तुम्ही घरी तयार करू शकता किंवा दुकानातून अथवा मेडिकलमधूनही खरेदी करू शकता. हे मास्क खरेदी करताना ते कापडी असावेत याची काळजी घ्या. घरी मास्क तयार करताना त्यामध्ये तीन लेअर असावेत. हनुवटीपासून डोळ्यांच्या खालच्या भागापर्यंत झाकणारे मास्क वापरावे. हा मास्क सॅनिटाईझ करावा शक्य असेल तर धुवावा. एका कपड्याचा मास्क हा कोरोनापासून बचाव  करेलच हे सांगता येत नाही.

दरम्यान गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे. मास्क वापरण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल. रेल्वे, बस, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं गरजेचं आहे. केवळ फेसमास्कवर अवलंबून राहाणंही धोक्याचं आहे असं WHO चे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस एडहेनॉम यांचं मत आहे. यासाठी इतर उपाययोजना आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे. याशिवाय आरोग्याची स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि इतर उपययोजना जसं की सॅनिटाइझ, योग्य आहार इत्यादी करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!