#CoronoEffect : साध्या मिस्ड कॉलची दखल घेऊन, “त्या” महिला आयपीएस अधिकाऱयाने अर्ध्या रात्री काय केले ते पहाच …

अधिकारी असावा तर असा…
जिथे अधिकाराच्या पदावर बसलेले आयएएस /आयपीएस अधिकारी लोकांशी वागताना अत्यंत मुजोरपणा वागतात , त्यांच्या फोनवर आलेल्या मिस कॉलला उत्तर देणे तर दूरच पण हे अधिकारी आलेले कॉल सुद्धा अटेंड करीत नाहीत. मात्र आंध्र परदेशातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने असे काही उदाहरण आपल्या लोकांसमोर ठेवले कि , ज्यामुळे अनेक उपाशीपोटी मजुरांचे या महिला अधिकाऱ्याने आशीर्वाद घेतले त्यासंबंधीचे हे वृत्त आहे. अशा या मानवतावादी हृदयाच्या अधिकाऱ्याच्या कार्याला महानायक ऑनलाईनचाही सलाम.
Smt. B. Raja Kumari, IPS, SP, VZM dist received a phone call from a migrant woman at midnight, on that she prepared food at mid night, took them to quorantaine center and feeded them at midnight of 15/16-05-2020. pic.twitter.com/gKLDWqJD5d
— vizianagaramdistrictpolice (@vizianagaramdi2) May 16, 2020
मुळात समाजातील काही लोक आय ए एस / आय पी एस झाल्यानंतर शिंगे फुटल्यासारखे वागतात. सर्वसामान्य लोकांपेक्षा आपण कुणीतरी वेगळे असल्याचा साक्षत्कार होतो वास्तवात हे लोक शासनाचे , पर्ययाने जनतेचे सेवक , नोकर असतानाही त्यांना का कुणास ठाऊक काही विशेष अधिकारांमुळे अहंकार येतो . आपण कोणीतरी विशेष व्यक्ती आहोत अशी त्यांची वर्तणूक असते पण अनेक अधिकाऱ्यांमध्ये मानवता ओत:प्रेत भरलेली असते . आपले पद निमित्तमात्र आहे आणि आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे या भावनेतून ते कार्य करतात. अशाच एका आयपीएस महिला अधिकाऱ्याचा अनुभव नक्कीच इतर अधिकाऱ्यांसाठी आदर्शवत आहे .कोरोना संकटाचा सामना करीत असताना देशातील विविध भागांमध्ये मजूर अत्यंत बिकट परिस्थितीत प्रवास करीत आहेत. अनेकांना तर पोटभर खायलाही मिळत नाही. कित्येकांचा अशा परिस्थितीत मृत्यूही झाला आणि होत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर यामध्ये आंध्र प्रदेशातून एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. येथे एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी रात्री जागून प्रवासी मजुरांना जेवण तयार करुन दिलं. बी राजा कुमारी पुर्ण दिवस ड्यूटी केल्यानंतर घरी जाणार होत्या, तेव्हाच त्यांच्या फोनवर एक मिस्डकॉल आला.
"There are people in the world so hungry, that God cannot appear to them except in the form of bread."
~Mahatma Gandhi
B Raja Kumari, #IPS @SPVizianagaram your down to earth and completely natural gesture speaks for itself.#GoodJobCop#FeedTheNeedy https://t.co/FB4ES8qIPu— IPS Association (@IPS_Association) May 17, 2020
याबाबत अधिक माहिती देताना राजा कुमारी म्हणाल्या की, माझ्या मोबाइलवर मिस्डकॉल होता. मी त्या क्रमांकावर पुन्हा कॉल केला. त्यावेळी फोनवरुन एका महिलेने खाण्यासाठी मागितले. तिचा आवाज खूप थकलेला येत होता. त्यावेळी मी माझ्या सहकाऱ्यांना काही खाण्याची सोय होऊ शकते का याबाबत विचारलं. त्यावेळी त्यांनी आता काही शक्य होणार नसल्याचं सांगितलं तर काही लोकांनी या मजुरांना ब्रेड देण्याचा सल्ला दिला. मात्र यातून त्यांची भूक जाणार नाही,असे त्यांना वाटले आणि त्यांनी लेमन राईस बनविण्याचं ठरवलं. शिवाय आरोग्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे आणि तो शिवाय तातडीने तयार करता येण्यासारखा आहे असे वाटल्याने त्यांनी सर्व तयारी केली आणि त्यांनी स्वतः फोनवरुन मदत मागणारी महिला आणि तिच्यासोबत असलेले 17 जण 700 किमीचा प्रवास करुन आले होते. या आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी स्वतः जेवण तयार केलं आणि रात्री दीड वाजता जेवण घेऊन तेथे पोहोचल्या. त्यांना पोटभरुन खाऊ घातलं आणि त्या सर्वांना नंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
अनुभवातील आयपीएस / आयएस अधिकारी आलेला फोन लवकर उचलत नाहीत , फोनवर आलेल्या मॅसेजची दखल घेण्याचे , त्यांना रिप्लाय देण्याचे साधे सौजन्यही दाखवीत नाहीत . इथे तर या आयपीएस अधिकारी महिलेने फोनवर आलेल्या मिसकॉलला केवळ कॉल बॅकच केले नाही तर फोनवर जबाबदारी न टाळता , हे माझे काम नाही असे न सांगता स्वतः अर्ध्या रात्री भुकेलेल्यांना अन्न दिले हि नक्कीच महत्वाची बातमी आहे.