बस -ट्रक च्या भीषण अपघातात ९ मजूर जागीच ठार

आज, मंगळवारी सकाळी महाराष्ट्रामध्येही यवतमाळ जवळ मजुरांच्या गाडीला अपघात होऊन या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर १५ जखमी झाल्याचे वृत्त आल्यानंतर बिहारमधील भागलपुर येथे झालेल्या एका भीषण अपघातात नऊ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मजुरांनी भरलेला ट्रक आणि बसमध्ये हा दुर्देवी अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळावर तात्काळ दाखल जाले. जखमींना उपचारासाठी जवळील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधून मजुरांना घेऊन जात होते. त्यावेळी ट्रक आणि बसची धडक झाली. त्यानंतर ट्रक पलटी झाला आणि दरीत कोसळला. घटनास्थळावरच नऊ जणांचा मृत्यू झाला.
Nine migrant labourers killed when truck carrying them overturns in an attempt to avert head-on collision with a bus in Bihar's Bhagalpur district: Police
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2020