#CoronaVirusUpdate : Maharashtra : खा. इम्तियाज जलील कोणाला देत आहेत धमकी ? आणि सरकारवर का करताहेत गंभीर आरोप ?

औरंगाबाद शहर रेड झोनमध्ये असताना महाराष्ट्रातील तिन्हीही झोनमध्ये काही अटींना बांधील राहून दारूची दुकाने सुरु करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर राज्य शासनानेही सायंकाळ पर्यंत नव्या लॉकडाऊनची घोषणा करीत असताना रेड , ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये काय चालू राहील आणि काय नाही याची सूची जाहीर केली त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या झोननुसार आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार आपली मार्गदर्शिका प्रकाशित केली त्यामुळे प्रत्येक झोन मधील नागरिकांना त्या त्या जिल्ह्यात लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करणे त्या त्या जिल्ह्यातील लोकांना सोयीचे झाले यात शंका नाही.
दरम्यान औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जरी केलेला मनाई आदेश जारी होताच रात्री ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास फेसबुक लाईव्ह वरून औरंगाबाद शहरात दारूची दुकाने सुरु करण्यास खा. इम्तियाज जलील यांनी तीव्र विरोध दर्शवित असताना त्यांनी सरकारवर दारू दुकानदारांच्या दबावात येऊन, आर्थिक लेन-देन करून सरकारने हा निर्णय घेतल्याचा जाहीर आरोप केला. औरंगाबादमध्ये दारूची दुकाने सुरु केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा वजा धमकी देताना ते म्हणाले कि , असे झाले तर आम्ही लॉकडाउनचे सर्व नियम तोडून आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू. खा. इम्तियाज जलील यांनी दिलेल्या या इशाऱ्याचा विचार करून जिल्हाधिकारी आणि राज्य शासन आपला निर्णय बदलणार का ? असा प्रश्न चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे जिलाधिकाऱ्यांनी रात्रीच औरंगाबादसाठीची नियमावली जाहीर करून टाकली आहे . त्यात काही दुरुस्ती केली जाईल का ? हे आता पाहावे लागणार आहे.