Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“अम्मा गेल्यापासून मोदीच आमचे आणि देशाचे डॅडी ” : अण्णाद्रमुक

Advertisements
Advertisements
Spread the love

अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आणि मंत्री केटी राजेंद्र बालाजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे आणि देशाचेही डॅडी आहेत म्हटले आहे. पक्षाची बैठक पार पडल्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले . पत्रकारांनी त्यांना जयललिता यांनी राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करण्याचे  टाळलेले  असताना अण्णाद्रमुकने लोकसभेसाठी भाजपशी कशी काय आघाडी केली ? असा प्रश्न केला. यावर बोलताना त्यांनी “नरेंद्र मोदी आमचे डॅडी असल्याचे म्हटले आहे . ‘अम्माचं (जयललिता) निधन झाल्यापासून मोदीच आहेत ज्यांनी डॅडींप्रमाणे पक्षाचं मार्गदर्शन केलं’, असे  बालाजी यांनी म्हटले  आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘हो नक्कीच…मोदी आमचे डॅडी आहेत. जेव्हापासून आम्ही आमच्या अम्माला गमावलं तेव्हापासून पंतप्रधान मोदींनी डॅडींप्रमाणे आम्हाला पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन केलं’. ‘मोदी फक्त अण्णाद्रमुकचे डॅडी नाहीत तर देशाचेही डॅडी आहेत. यामुळेच अण्णाद्रमुकने भाजपाशी आघाडी केली आहे’, असं बालाजी यांनी सांगितलं.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!