Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Cyber Crime : भामट्याने महाविद्यालयीन तरूणीस गंडविले…

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : बँकेतून बोलत असल्याची थाप मारून भामट्याने महाविद्यालयीन तरूणीच्या बँक खात्यातून ४४ हजार ५०८ रूपये लंपास केले. हा प्रकार ९ ते १९ मार्चदरम्यान घडला असून भामट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञा यशवंत सिरोरे (वय २२, रा.मयुरनगर, हडको एन-११) या तरूणीच्या मोबाईलवर ९ मार्च रोजी भामट्याने संपर्क साधला होता. भामट्याने आपण अ‍ॅक्सीस बँकेतून बोलत असून गेल्या सहा महिन्यात तुम्ही क्रेडिट  कार्डाचा वापर न केल्यामुळे कार्ड ब्लॉक होणार असल्याचे सांगितले. तसेच कार्ड ब्लॉक होऊ द्यायचे नसेल तर मोबाईलवर येणारा ओटीपी क्रमांक व क्रेडिट  कार्डाचे डिटेल विचारून घेतले. त्यानंतर भामट्याने ९ ते १९ मार्चदरम्यान प्रज्ञा सिरोरे हीच्या बँक खात्यातून ४४ हजार ५०८ रूपये ऑनलाईनरित्या लंपास केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!