#CoronaVirusEffect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? भलेही तो गजाआड गेला पण, लॉकडाऊनचे निमित्त साधून “त्याने ” केले दुसरे लग्न….!!

लॉकडाउनमुळे माहेरी गेलेली पत्नी वारंवार बोलावल्यानंतरही सासरी परत न आल्याने नवऱ्याने दुसरे लग्न केल्याची घटना उघड झाली आहे. बिहार राज्यातील दुल्हीन बाजार भागात ही घटना घडली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुसरे लग्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव धीरज असे आहे. तो भरपुरा येथील रहिवासी आहे. धीरचे लग्न काही वर्षांपूर्वी करपीमधील पुराण येथे झाली होती. धीरजची पत्नी काही कामानिमित्त आपल्या माहेरी गेली होती. त्याच दरम्यान लॉकडाउन घोषित करण्यात आले. लॉकडाउनमुळे त्याची पत्नी तिच्या माहेरी अडकल्याने ती भरपुऱ्याला येऊ शकली नाही. त्याने वारंवार बोलावूनही पत्नी परत न आल्याने तो रागावला. त्याने रागात दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने खिरीमोर भागातील रघुनाथपूर येथे त्याच्या प्रेयसीशी दुसरे लग्न केले.
दरम्यान आपल्या नवऱ्याने दुसरे लग्न केल्याचे समजल्यानंतर हादरलेल्या पत्नीने दुल्हीन बाजार पोलिस ठाण्यात नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली. आपल्या नवऱ्याने दुसरे लग्न केल्याचे कळल्यावर पत्नीने पती आणि सासऱ्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि नवऱ्याने दुसरे लग्न केल्याचा आरोप करत दुल्हीन बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पत्नी तक्रार दाखल केल्यानंतर दुल्हीन बाजार पोलिसांनी दुसरे लग्न करणाऱ्या धीरजला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.