#CoronaVirusUpdate : गेल्या २४ तासात ८२६ नवे रुग्ण तर २८ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासात २८ मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यूंचं प्रमाण कमी झालं आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. गेल्या २४ तासात ८२६ करोना पॉझिटिव्ह देशात आढळले आहेत. त्यामुळे आता देशातली करोना रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ झाली आहे. देशभरात लॉकडाउनचा कालावधी हा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. १४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातली घोषणा केली. दरम्यान देशातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती आज आरोग्य मंत्रालयाने दिली. तसंच ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या याबाबत WHO शी चर्चा झाल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
India's total number of #Coronavirus positive cases rises to 12,759 (including 10,824 active cases, 1514 cured/discharged/migrated and 420 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/cAI2YMIxGP
— ANI (@ANI) April 16, 2020
देशात करोनाच्या रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ एवढी झाली आहे. १५१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत देशभरात करोनामुळे ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढंच नाही तर WHO सोबतही चर्चा झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
आज पुण्यात मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठ परिसरातील ५४ वर्षीय पुरूष व कोंढवा येथील ४७ वर्षीय महिलेचा व शहरातील गुलटेकडी भागातील एका ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. पुणे शहरासह जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहराचे तीन भाग (रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन) घोषित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुण्यातील करोनाच्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून विस्तृत अहवाल मागितला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी राम यांनी याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे.
A 55 years old COVID19 patient passes away in Pune. The patient had comorbid conditions; the total death toll in Pune now stands to 47: Pune Health Officials https://t.co/iaSojymQHW
— ANI (@ANI) April 16, 2020