#CoronaVirus Pandemic #Covid-19 #Latestupdated : जगभरातील १९ लाख कोरोनाच्या विळख्यात, भारताची संख्या १० हजाराच्या घरात, ३२४ मृत्यू

CoronaVirus Pandemic #Covid-19 #Last updated: April 13, 2020, 17:34 GMT
World : दुनिया | Source : worldometers.info
एकूण रुग्ण : 18 लाख 98 हजार 018 | एकूण मृत्यू : 1 लाख 17 हजार 785 । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 4 लाख 38 हजार 540
ACTIVE CASES : 1,341,693 (Currently Infected Patients) | 1,290,174 (96%) in Mild Condition | 51,591 (4%) Serious or Critical
CLOSED CASES : 556,325 (Cases which had an outcome) | 438,540 (79%) : Recovered / Discharged | 117,785 (21%) : Deaths
India: भारत | Source : worldometers.info | #Last updated: April 11, 2020, 02:30 GMT
एकूण रुग्ण : 10 हजार 453 | एकूण मृत्यू : 358 ( 23%) । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 1,181 (77%) | बंद केसेस : 1, 539
905 new positive cases and 51 deaths reported in the last 24 hours as India's total number of #Coronavirus positive cases rises to 9352, death toll stands at 324. https://t.co/3bApqH35nd
— ANI (@ANI) April 13, 2020
जगभरात कोरोनाने कहर केला असून देशभरात गेल्या चोवीस तासात करोनाचे ९०५ रुग्ण वाढले आहेत त्यामुळे करोनाग्रस्तांची संख्या ९ हजार ३५२ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत देशभरात ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला ८ हजार ४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ९८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात करोनामुळे ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. अशीही माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. करोनापासून देशाचा बचाव व्हावा यासाठी १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या देशाशी संवाद साधणार आहेत. त्यामध्ये ते लॉकडाउनबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोनही तयार करण्यात आले आहेत. देशातही असेच झोन तयार करण्यात येतील अशी शक्यता आहे.