#CoronaVirusUpdate : मुंबईत कोरोनाचे १५० रुग्ण तर दिवसभरात ९ जणांचा मृत्यू , ४३ जणांना डिस्चार्ज…

Mumbai: 150 new positive cases & 9 deaths reported today in Mumbai. Of the 9 deaths today, 7 had co-morbidity. Total number of cases now stands at 1549 and total deaths at 100 in the city. 43 patients have been discharged today; total 141 discharged till date. #COVID19 pic.twitter.com/n5eFSfYDWe
— ANI (@ANI) April 13, 2020
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून एकट्या मुंबईत करोनाचे १५० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या रुग्णांची संख्या आता १५४९ झाली असून आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाची बाधा झाल्याने एकूण १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ४३ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला तर आत्तापर्यंत १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात ३५२ नवीन रुग्ण आढळले असून ११ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २३३४ इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
352 new #Coronavirus positive cases and 11 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases in the state rises to 2334: Maharashtra Health Department pic.twitter.com/nAq1IhLWg4
— ANI (@ANI) April 13, 2020
राज्य शासनाने कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन केलेल्या वर्गवारीनुसार मुंबई शहर हे रेड झोनमध्ये गेलं आहे. कारण महाराष्ट्रात मुंबई आणि त्यानंतर पुणे या दोन शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवांची दुकानं सुरु राहणार आहेत. मात्र त्यासाठी आता वेळेची मर्यादा असणार आहे. तसेच कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन आखण्यात आले आहेत. जिथे १५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत ते रेड झोन, त्यापेक्षा कमी आहेत तिथे ऑरेंज झोन आणि रुग्ण नसलेले भाग ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहेत. तसंच लोकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडायचंच असेल तर मास्क लावून बाहेर पडावे असे आवाहन सरकारने केले आहे.