#CoronaVirusEffect : गुजरातच्या सुरतमध्ये काल रात्री नेमके काय झाले ?

Gujarat:Migrant workers in Surat resorted to violence on street allegedly fearing extension of lockdown."Workers blocked road&pelted stones.Police reached the spot&detained 60-70 people.We've come to know that they were demanding to go back home",said DCP Surat,Rakesh Barot(10.4) pic.twitter.com/q09Z7lsLwR
— ANI (@ANI) April 10, 2020
संपूर्ण देशभरात कोरोनाची दहशत असून कोरोनाच्या संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून देशात सर्वत्र लॉक डाऊन चालू आहे मात्र गुजरातमधील सुरतमध्ये शुक्रवारी रात्री हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले होते. हे सर्व कामगार आपल्याला पगार दिला जावा याची तसेच पुन्हा घरी परतण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी करत होते. यावेळी कामगारांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. कामगारांनी हातगाड्यांची जाळपोळ केली तसंच दुकानांची आणि इतर सार्वजनिक संपत्तीची तोडफोड केली. यापैकी बरेच कामगार वस्त्रोद्योग फॅक्टरीत काम करतात. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर या फॅक्टरी बंद पडल्या असून कामगारांच्या हातात काहीच काम नाही. तसंच वाहतूक बंद असल्याने त्यांच्या घरी जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. यामधील अनेक कामगार ओडिशाचे नागरिक आहेत.
याबाबत डीसीपी राकेश बारोत यांनी सांगितले कि , “कामगारांनी अनेक रस्ते अडवून ठेवले होते तसंच दगडफेकही करण्यात आली. या प्रकरणात ६० ते ७० लोकांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व लोक आपल्याला पुन्हा घरी पाठवण्याची सोय करावी अशी मागणी करीत आहेत. घरी जाण्यासाठी परवानगी मागत स्थलांतरित कामगारांनी अशा पद्धतीने हिंसाचार करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी पोलिसांनी ९५ कामगारांविरोधा हिंसाचार आणि दंगल प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हिंसाचारात पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या होत्या.