#CoronaVirusUpdate : मोठी बातमी : जगातील २०० देश कोरोनाच्या विळख्यात , भारतात आज किंवा उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता…

#BREAKING The US becomes the first country to record more than 2,000 #coronavirus deaths in one day, with 2,108 fatalities in the past 24 hours, according to the Johns Hopkins University tally pic.twitter.com/QREocIGjVq
— AFP News Agency (@AFP) April 11, 2020
गेल्या ४ महिन्यापासून कोरोना व्हायरसने जगभर उच्छाद मंडल असून जगातील जवळपास २०० देश कोरोनाच्या टपणे फणफणले आहेत . विशेष करून चीन पाठोपाठ इटली, स्पेन, अमेरिका अशा अनेक मोठ्या देशांमध्ये अक्षरश: कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर ओडीसा आणि पंजाब या दोन राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील १५ जिल्हे पूर्ण सील केले आहेत. भारतात आतापर्यंत साडेसात हजाराच्या जवळपास लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ह्या व्हायरसमुळे २३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील परिस्थितीबाबत ११ किंवा १२ एप्रिलपर्यंत या संदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. २४ तासांत ३२ रुग्णांचा मृत्यू तर ८९६ नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या या घडीला १५७४ पर्यंत पोहोचली असून मृत्यूंचा आकडा ११० पर्यंत पोहोचला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १००८ पर्यंत पोहोचली आहे. त्यातही पुण्यात २५४, कोल्हापूर ३७, अकोला ३४ आणि नागपूरात २६, औरंगाबादेत २० रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार सध्या राज्याची संख्या १५७४ पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे जगभरात १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १६ लाख ९९ हजार ६३१ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. जगभरात पावणे ४ लाख लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येनं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. एका दिवसात २ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू जगात पहिल्यांदाच घडला आहे. इटली असा पहिला देश आहे जिथे आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे १८ हजार८४९ रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे १८ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ३९ हजार ४०० लोकांना लागण झाली आहे. तर अमेरिकेमध्ये १८ हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटली, स्पेन, अमेरिकेला सर्वात जास्त कोरोनाचा धोका आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार बंद असल्यानं आर्थिक नुकसान झालं आहे.