#CoronaVirusUpdate : प्रयोगशाळा खासगी असो कि शासकीय, कोरोनाची चाचणी मोफत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Supreme Court issued following interim directions to Centre: Tests relating to COVID19 whether in approved govt laboratories or approved private labs shall be free of cost,the Apex Court said and that Centre shall issue necessary directions in this regard immediately (1/3) pic.twitter.com/p7MPMEomzk
— ANI (@ANI) April 8, 2020
कोरोनाचा कहर देशात वाढत चालल्याने लोकांची कोरोना व्हायरस टेस्ट करणे आवश्यक झाले आहे . या पार्श्वभूमीवर सरकारी असो की खासगी प्रत्येक प्रयोगशाळेत करोनाची चाचणी मोफत करण्याचे निर्देश सर्वोच्च नायायालयाने केंद्र सरकारला आज दिले. ऍड. शशांक देव सुधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीतसर्वोच्च नायायालयाने हे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळा मग त्या सरकारी असो की खासगी या ठिकाणी करोना व्हायरसची चाचणी मोफत करण्यात यावी, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने तात्काळ यासंबंधी आदेश जारी करावेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅब्रोटरीज (NABL) परवानी असलेल्या प्रयोगशाळा किंवा WHO आणि ICMR ने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळांमध्ये करोनाची चाचणी मोफत करावी, असं सुप्रीन कोर्टाने म्हटलंय. करोनाचा रुग्णांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही सरकार आणि पोलिसांची आहे. करोना रुग्ण होम क्वारंटाइन असल्यावर किंवा वैद्यकीय पथकांकडून जिथे त्यांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे तिथे रुग्णांना सुरक्षा पुरवावी, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिलेत. डॉक्टर, वैद्यकीय पथकंवर होणारी दगडफेक किंवा त्यांची गैरवर्तणाचे प्रकार समोर आले आहेत. याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली. या घटनांमुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे सरकार आणि पोलीस प्रशासनाने त्यांना सुरक्षा पुरवावी, असं सु्प्रीम कोर्टानं म्हटलंय.