#CoronaVirusUpdate : दिवसभरात आढळले ६९३ नवे रुग्ण , तर ३० जणांचा मृत्यू

Number of #COVID19 deaths stand at 109, with 30 people succumbing to it yesterday. 63 per cent of the deaths have been reported among people over 60 years age, 30 per cent in age bracket of 40 to 60 years & 7 per cent victims were below 40 years age: Lav Aggrawal, Health Ministry https://t.co/fj6gx4QuDy
— ANI (@ANI) April 6, 2020
कोरोनाच्या पार्शवभूमीवर देशात लॉकडाउन असूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६९३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. काल दिवसभरात ३० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत २ मृत्यू नोंदले गेले आहेत. २४ तासांतल्या या ३२ मृत्यूंमुळे भारतात कोरोनाबळींची संख्यासुद्धा १०९ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी हि माहिती दिली . सायंकाळी ६ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांची एकूण संख्या ४२८१ , उपचारानंतर बरे झालेले रुग्ण ३१९, एकूण मृत्यूंची संख्या १११.
अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाचीही कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाविषयी एक बैठक झाली. त्याबद्दलही अग्रवाल यांनी माहिती दिली. कौन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत पुढे काय उपाय योजायचे यावर चर्चा झाली. क्वारंटाइन विभाग, कुठल्या लक्षणांसाठी क्वारंटाइन विभागात दाखल करून घ्यायचं याविषयीचे नियम याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी पाहता ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला या विषाणूचा धोका जास्त आहे, हे स्पष्ट आहे. भारतात ६३ टक्के कोरोनाबळींचं वय ६०पेक्षा अधिक होतं. पण त्याखालोखाल ४० ते ६० वयोगटालाही मोठा धोका आहे, असं आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसतं. ३० टक्के मृत्यू या वयोगटातल्या कोरोनाग्रस्तांचे झाले आहेत. तर ४० पेक्षा कमी वय असलेल्या मृत्यूचे प्रमाण ७ टक्के आहे.
दरम्यान ८६ टक्के लोकांचा मृत्यू कोरोनाव्हायरसबरोबर इतर कुठला मोठा आजार असल्यामुळे झाला आहे, असेही आकडेवारी देत मंत्रालयाने स्पष्ट केलं. दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये भरलेल्या तबलिगी जम्मातच्या मेळाव्यामुळे देशभर मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला. तबलिगींमुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४४५ वर पोहोचली आहे. या मेळाव्याला देशभरातून लोक आले होते आणि आता अनेक जिल्ह्यांमध्ये ते संसर्ग घेऊन गेले आहेत.