#CoronaVirusUpdate : धक्कादायक : १४ दिवसांच्या क्वारंटाइननंतरही दुबईवरून परतलेला “तो ” तरुण निघाला पॉझिटिव्ह !!

A 22-year-old male residing in Sec-30, Chandigarh with a history of travel to Dubai has been diagnosed as the 8th #COVID19 positive case in the UT, as per report received from Postgraduate Institute of Medical Education & Research (PGIMER), this evening: Chandigarh Administration
— ANI (@ANI) March 27, 2020
जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसबाबत अद्याप कुठलेही ठोस संशोधन प्राप्त होत नसल्याने या व्हायरसपासून बचाव करणे हाच एक पर्याय असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे प्रचलित नियमानुसार कुठल्याही नव्या विषाणूचा मानवी शरीरात तग धरून संसर्ग पसरवण्याचा एक पॅटर्न असतो. मात्र या पॅटर्नला छेद देणारी केस भारतात सापडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. दुबईहून आल्यानंतर पंजाबमधल्या एका २२ वर्षीय तरुणाला घरातच विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता. त्याच्यामध्ये कुठलंही कोरोनाव्हायरसचं लक्षण दिसलं नाही, तरीही त्याने सरकारने दिलेला सल्ला मानून १४ दिवस स्वतःला घरात बंद केलं. १४ दिवसांच्या होम क्वारंटाइननंतर १५ व्या दिवशी त्याला ताप चढला. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली.
https://twitter.com/ManojPa47203819/status/1243513238941323265
देशभरातल्या सगळ्याच वैद्यकीय तज्ज्ञांचे आणि आरोग्य सेवकांचे चंदिगडमधल्या तरुणाच्या या विचित्र केसमुळे धाबे दणाणले आहे. होम क्वारंटाइन किंवा संशयित रुग्णांना केवळ १४ दिवसच अलग ठेवण्यात येते . त्या दिवसात लक्षणं दिसली नाहीत तर कोरोनाव्हायरसची लागण झाली नसल्याचं गृहित धरले जाते . आता चंदिगडच्या या केसमुळे मात्र वेगळाच धोका निर्माण झाला आहे. कोरोनाव्हायरसचे वागणं बदललं असेल आणि लक्षणं दिलायला अशा उशीर लागत असेल तर भारतात क्वारंटाइनचे नियम आणि मुदत बदलायला लागणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे माहिती दिली असल्याचे चंदिगडमधून सांगण्यात येत आहे.
चंदिगड येथील आयएएस अधिकारी मनोज परिदा यांनी यासंबंधी ट्वीट केलं आहे. परिदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या २२ वर्षीय तरुणाच्या संपर्कातल्या सगळ्या व्यक्तींना पुन्हा क्वारंटाइन केलं आहे आणि त्यांची टेस्ट करण्यात येणार आहे. आयसीएमआरच्या सल्ल्याप्रमाणे या विषाणूचा जिवंत किंवा अॅक्टिव्ह राहण्याचा कालावधी १४ दिवसांचा असतो. त्यामुळे आतापर्यंत सर्वांना १४ दिवसांचा क्वारंटाइनचा सल्ला दिला जात होता. १५ व्या दिवशी लक्षणं दिसलेला हा भारतातला पहिलाच रुग्ण असावा, असं चंदिगडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे संचालक बी. एस. चव्हाण यांनी सांगितलं.