#CoronaVirusEffect : पोलिस आयुक्तालयात कम्यूनिकेशन गॅप, पास असले तरी प्रवेशाला मनाई !!

औरंगाबाद – पोलिसआयुक्तालयात आज अचानक पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी कोणालाही प्रवेश देऊ नका, असा आदेश पोलिस कर्मचारी राजपूत यांना दिले. राजपूत यांनी सर्वांचाच रस्ता अडवला गुन्हे शाखेतील महिला कर्मचारी संजीवनी शिंदे फाईल घेऊन जात असतांना त्यांनाही मज्जाव केला.त्यांनी राजपूत यांची समजूत काढल्यानंतर त्यांना कसेबसे गुन्हेशाखेत जाता आले. तेवढ्यात पत्रकारांनाही प्रवेश मनाई आहे असे राजपूत यांनी काही पत्रकारांना सुनावले.रस्ता अडवणार्या राजपूत यांना पत्रकारांनी विशेष शाखेने जारी केलेले पासेस दाखवले तरी मकवाना मॅडम या पास ला मानत नाही असे सुनावले. हा प्रकार झोन १चे पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांना कळला. त्यांनी आणि गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी मध्यस्थी करंत या प्रकरणावर पडदा घातला.