#CoronaVirusUpdate : दिलासादायक : देशातील रुग्णांची संख्या ७१८ पण सर्वांची प्रकृती स्थिर, १४ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात नवे ५ रुग्ण

देशभरात दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी worldometer वेबसाईट्वर दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७१८ इतकी झाली असून मृतांची संख्या १४ झाली आहे. दरम्यान उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ४५ असल्याचे म्हटले आहे. यामध्ये दिलासादायक बातमी अशी आहे कि यातील एकही रुग्ण गंभीर नाही. राज्यात एकीकडे १५ करोनाबाधित रुग्णांना उपचार करुन घरी सोडल्याची दिलासादायक बातमी आल्यानंतर आता अजून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आज दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र तिच्या मृत्यूचं नेमकं कारण आम्ही तपास आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. याआधी वाशीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. यामुळे राज्यात करोनामुळे झालेल्या मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
दरम्यान केंद्रीय आरोग्य खात्याने ए एन आयला दिलेल्या माहितीनुसार देशात ८८ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६९४ वर गेली आहे. महाराष्ट्रात नवीन ५ रुग्ण आढळल्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या १३० झाली आहे . आज आढळलेल्या नवीन ५ रुग्णांमध्ये ३ सांगली आणि कोल्हापूर , पुणे प्रत्येकी एक . केंद्र सरकारने देशातील ३५ नवीन प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रात ९ प्रयोगशाळांचा समावेश आहे.
88 new #COVID cases reported in the country today, the highest in a single day. The total number of cases rises to 694 as per the Ministry of Health & Family Welfare data. pic.twitter.com/eEjYs5LuRI
— ANI (@ANI) March 26, 2020
दरम्यान जागतिक स्तरावर आज दुपारपर्यंत 502,973 एकूण रुग्णांची नोंद झाली. मृत्यूंची संख्या 22,339 तर ज्यांची प्रकृती सुधारली त्यांची संख्या 121,227 इतकी नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे इटलीत आज एकही मृत्यू झाला नाही. शिवाय एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. याउलट अमेरिकेत आज ५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन रुग्णांची संख्या ६, ८५५ इतकी झाली आहे. चीनमध्ये आज ६ जणांचा मृत्यू झाला असून नवीन रुग्णांची संखय ६७ इतकी झाली आहे. दरम्यान आज सर्वाधिक ४९८ मृत्यू स्पेनमध्ये तर १५७ मृत्यू इराणमध्ये झाले. त्यानंतर आज दुपारपर्यंत जर्मनीमध्ये ३३, स्विझर्लंडमध्ये ३८, इंग्लंडमध्ये १२, नेदर्लंडमध्ये ७८, बेल्जीयममध्ये ४२, ऑस्ट्रियामध्ये १८ नवीन रुग्णांचा मृत्यू झाला.
खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यात करोनाचे १२५ रुग्ण आहेत. नागपूरमध्ये करोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. महाराष्ट्रात कालच दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हे दाम्पत्य करोनाची लागण झालेलं पहिलं दाम्पत्य होतं. त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत कुणीही गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा, अत्यावश्यक सेवा या सगळ्या संचारबंदी आणि लॉकडाउनमधून वगळण्यात आल्या आहेत.